BJP MLA Padalkar : गोपीचंद पडळकरांचा बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप- जेलमध्ये धर्मांतराचे काम; महापुरुषांचे फोटो काढले, कीर्तनही बंद
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता बीड कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसेच जेलमधील कीर्तन बंद करण्यात आले असून कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयाचे आमिष दाखवले जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.