जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!
जसा आजोबा तसाच नातू; दोघांच्याही धमक्यात तद्दन फालतू!!, असलाच पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार राहिलाय. आजोबाने जशी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती, तशीच त्याच्या नातवाने भारताला सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. पण त्याचा आजोबा भारताचा कुठलाच केसही वाकडा करू शकला नाही, उलट त्या आजोबालाच भारतात येऊन भारतीय नेत्यांसमोर नाक घासावे लागले. त्यापेक्षा त्या आजोबाच्या नातवाची अवस्था वेगळी होण्याची शक्यता नाही.