Chhagan Bhujbal : भुजबळांचा जामीन रद्द होऊ शकतो; ठाकरे गटाने व्यक्त केला संशय; मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला
बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आक्रमकपणे पार पडल्यानंतर, आता या मेळाव्यातील वक्तव्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत महायुतीतील सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट टीका केल्यामुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. दानवे यांनी भुजबळ यांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला देत, त्यांच्या जामिनाबाबतही सूचक विधान केले आहे.