CM Fadnavis : फडणवीसांचा विरोधकांना इशारा- भाजप काचेच्या घरात नाही, दगड फेकू नका; पक्ष कार्यालयासाठी जागा बळकावल्याचा आरोप फेटाळला
मुंबईतील भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नका,’ असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या लहान कार्यालयातील अडचणी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेथे बसून केलेली निवडणूक तयारी याची आठवण सांगितली, तसेच पक्षाने हे कार्यालय घेण्यासाठी सर्व नियम पाळून, स्वतःच्या पैशाने जागा विकत घेतल्याचे ठामपणे स्पष्ट केले.