Bhaskar Jadhav : निधीवरून भास्कर जाधव यांचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल; अर्थविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
राज्याच्या अर्थसंकल्पीय व्यवहारांवर आणि निधीच्या वितरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत कडक शब्दांत टीका केली. “कोणाला किती निधी द्यायचा, हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात?” असा थेट सवाल करत त्यांनी अर्थविभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.