Devendra Fadnavis : संविधानात ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्द; देवेंद्र फडणवीसांनी सरसंघचालकांच्या वक्तव्याचे केले समर्थन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ‘भारत’चे भाषांतर करू नये अन्यथा आपण देशाची ओळख आणि जगात मिळणारा आदर गमावू, अशी भीती व्यक्त केली होती. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भागवत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, संविधानात ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्द वापरले आहेत. तथापि, जर आपण ‘भारत’ वापरला तर ते अधिक चांगले होईल. ‘भारत’ या शब्दाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मोहन भागवत यांनी काहीही वादग्रस्त म्हटलेले नाही. त्यांच्या वक्तव्याला वादात रूपांतरित करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.