Anil Deshmukh : नागपुरात महाविकास आघाडीत मोठी फूट; काँग्रेसने रात्री 3 वाजता युती तोडल्याचा अनिल देशमुखांचा आरोप
महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागपुरात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. जागावाटपाच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेरच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी काँग्रेसवर जाणीवपूर्वक दगाबाजी केल्याचा गंभीर आरोप करत, आता आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.