Mahayuti BMC : महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा- मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट
मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.