Rakesh Kishor : CJI हल्ला; आरोपी वकिलाचे बार असोसिएशन सदस्यत्व रद्द, बंगळुरूमध्ये FIR
भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बी.आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर (७१) यांचे सदस्यत्व सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (एससीबीए) गुरुवारी तात्काळ प्रभावाने रद्द केले. एससीबीएने म्हटले आहे की वकिलाचे वर्तन व्यावसायिक नीतिमत्ता, शिष्टाचार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे गंभीर उल्लंघन आहे.