Bengaluru Jail : बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये अतिरेकी, हत्येच्या आरोपींना टीव्ही-फोनची सोय; VIP वागणुकीवर भाजपचा सवाल
बंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहाची पुन्हा एकदा चौकशी सुरू आहे. कारागृहातील एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जुहाद हमीद शकील मन्ना फोन वापरताना दिसत आहे. शकीलवर दहशतवादी संघटना ISIS मध्ये तरुणांना भरती करण्याचा आरोप आहे.