Bengal teacher : बंगाल शिक्षक भरती घोटाळा- नोकरी गमावलेल्या शिक्षकांचे आंदोलन; ममता बॅनर्जींनी स्वतः बोलण्याची मागणी
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गमावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी शिक्षकांनी शिक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या ‘विकास भवन’ बाहेरील बॅरिकेड्स तोडले आणि घोषणाबाजी करत निषेध सुरू केला.