Mehul Choksi : मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड कारागृहात बराक सज्ज, दोन सेलमध्ये अटॅच बाथरूमसह टीव्ही-पंखे; भारताने बेल्जियमला पाठवले फोटो
१३ हजार ८५० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी उद्योगपती मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाचे अधिकृत फोटो बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहेत. याद्वारे, चोक्सीला त्याच्या प्रत्यार्पणानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवल्यावर कोणत्या सुविधा मिळतील हे सांगण्यात आले.