Pankaja Munde : बीडच्या ओबीसी मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या- भुजबळांनी याआधीही असे मेळावे घेतलेत, त्यांनी त्यांची बाजू मांडली असावी
बीड जिल्ह्यात नुकताच झालेला ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा गाजला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी सरकारवर आणि विशेषतः मराठा आरक्षणाच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. भुजबळांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणाविषयी विचारले असता, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मी त्यांची भाषणे पाहिली नाहीत, थोड्या वेळाने पाहील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच भुजबळ साहेबांनी त्यांची बाजू मांडली असावी, असेही त्या म्हणाल्या.