Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक-एक नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यातच आता तिच्या वडिलांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील, अशा शब्दांत त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. शिवाय या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून बीडच्या न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी मृत डॉक्टरच्या वडिलांनी केली.