Aditya Thackeray : पाकिस्तानसह खेळणे राष्ट्र- मानवविरोधी; आदित्य ठाकरेंची बीसीसीआयवर जोरदार टीका
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही बीसीसीआय पैशासाठी हा सामना खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. बीसीसीआयची ही भूमिका देशाच्या आणि सैनिकांच्या बलिदानाचा अपमान करणारी असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे ‘राष्ट्रविरोधी’ आणि ‘अमानुष’ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.