David Eby : भारत-कॅनडा संबंध सुधारल्याने खालिस्तान समर्थक चिडले; बीसी प्रीमियर डेवी एबी यांच्या दौऱ्यामुळे संतप्त
खालिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारत सरकारच्या संबंधांमध्ये आलेल्या दुराव्यानंतर कॅनडा सरकार आता भारतासोबत संबंध पूर्ववत करून व्यापार करू इच्छिते. यासाठी ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर डेव्हिड एबी एका शिष्टमंडळासोबत भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर खालिस्तान समर्थकांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे.