BBC India : ED ने बीबीसी इंडियावर ₹3.44 कोटींचा दंड ठोठावला; FDI नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस इंडियावर थेट परकीय गुंतवणूक (FDI) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ₹3.44 कोटींचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या तीन संचालकांवरही कारवाई केली असून, त्यांच्यावर 1.14 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.