Bawankule : राज्यात 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती
राज्यातील 80 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश आज काढण्यात आले. विशेष म्हणजे, तहसीलदारपदाचीही निवडसूची लवकरच होणार आहे. दीड महिन्याआधी महाराष्ट्रात साठ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणीत देऊन त्यातील 34 अधिकाऱ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते, त्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तातडीने जात प्रमाणपत्रे मिळण्यास गती मिळाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसांच्या धडक कृती कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.