ISRO : इस्रोने भारतीय अंतराळ स्थानकाचे मॉडेल दाखवले; 2028 पर्यंत पहिले मॉड्यूल लाँच होणार; सध्या फक्त अमेरिका-चीनकडेच स्पेस स्टेशन
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) शुक्रवारी भारतीय अंतराळ स्थानकाचे (बीएएस) मॉडेल प्रदर्शित केले. उद्या म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन आहे. आज तत्पूर्वी, दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतीय अंतराळ स्थानकाचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. भारत २०२८ पर्यंत बीएएसचे पहिले मॉड्यूल प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे.