Bardhaman Railway : पश्चिम बंगालमधील बर्दवान स्टेशनवर चेंगराचेंगरी, 7 प्रवासी जखमी; प्रचंड गर्दीमुळे दुर्घटना
रविवारी संध्याकाळी बर्दवान रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्यासाठी गर्दी केली तेव्हा चेंगराचेंगरी झाली. स्टेशनच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाल्याने किमान सात प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने बर्दवान मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.