Laxman Hake : ओबीसी आक्रमक : हाके यांचे बारामतीत आंदोलन, फक्त गॅझेटवर प्रमाणपत्र मिळणार नाही- बावनकुळे
मराठा आरक्षण जीआरविरुद्ध ओबीसी समाजाने एल्गार सुरू केला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून गेले दोन दिवस जीआरची होळी करण्यात आली. जीआर फाडण्यात आला. शुक्रवारी सकल ओबीसी समाजातर्फे औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील येळी फाटा येथे शुक्रवारी ३ तास रास्ता रोको करण्यात आला. त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी करण्यात आली होती.