Maharashtra : राज्यात प्रशासकिय विस्तार:नवीन अप्पर जिल्हाधिकारी तसेच अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित, हरकती व सूचना मागविल्या जाणार
राज्यात प्रशासकिय सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. या शिवाय दोन ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव देखील आहे. या संदर्भात अधिसूचना तातडीने प्रसिध्द करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत.