CM Devendra Fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचा विचार करण्याचा सल्ला
अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कुणीही पतंगबाजी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. या प्रकरणी आपण मृत व्यक्तीच्या पद व प्रतिष्ठेचा तथा त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला हवा, असे ते म्हणालेत.