Sharad Pawar : अतिवृष्टीने केवळ शेतकरीच नव्हे, तर बारा बलुतेदार बाधित; तातडीने उपाययोजना करण्याची शरद पवारांची मागणी
महाराष्ट्रात सध्या सर्वत्रच अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे