BAPS organization : अमेरिकेतील BAPS संस्थेविरुद्धचा तपास बंद; न्यू जर्सी मंदिर प्रशासनावर कामगारांचे शोषण- मानवी तस्करीचा होता आरोप
अमेरिकेच्या न्याय विभाग आणि न्यू जर्सी जिल्ह्याने न्यू जर्सीमधील BAPS मंदिराचा तपास बंद केला आहे. मंदिरावर कामगारांचे शोषण आणि मानवी तस्करीचा आरोप होता. मंदिराच्या बांधकामादरम्यान कामगारांना प्रति तास फक्त $1.20 वेतन देण्यात आले होते असाही आरोप करण्यात आला होता.