Banu Mushtaq : भारताच्या बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार; हार्ट लॅम्प हा सन्मान मिळवणारे पहिले कन्नड पुस्तक
भारतीय लेखिका, वकील आणि कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. हार्ट लॅम्प हे बुकर पारितोषिक मिळवणारे कन्नड भाषेतील पहिले पुस्तक आहे. दीपा भाष्टी यांनी त्याचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.