• Download App
    Bank Of Baroda | The Focus India

    Bank Of Baroda

    Anil Ambani बँक ऑफ बडोदाकडून अनिल अंबानी, आरकॉम कंपनी फ्रॉड घोषित; तिसऱ्या बँकेची कारवाई

    स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोद्यानेही दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि त्याचे माजी संचालक अनिल अंबानी यांना फ्रॉड घोषित केले आहे. आरकॉमने सांगितले की, त्यांना २ सप्टेंबर रोजी बँक ऑफ बडोदाकडून पत्र मिळाले, ज्यामध्ये कंपनी व अंबानी यांचे कर्ज खाते ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करण्यात आले. बँकेने कंपनीला १,६०० कोटी रुपये व ८६२.५० कोटींची कर्जमर्यादा दिली होती. २८ ऑगस्टच्या स्थितीनुसार एकूण २,४६२.५० कोटींपैकी ₹१,६५६.०७ कोटी रुपये अजून थकीत आहेत. हे खाते ५ जून २०१७ पासून एनपीए म्हणून घोषित आहे. बँकेचे म्हणणे आहे की हा निर्णय फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टवर आधारित असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आहे.

    Read more

    SBI, PNB, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 1 फेब्रुवारीपासून या बँकांमध्ये बदलणार हे नियम

    बँका वेळोवेळी आपले नियम बदलत राहतात, परंतु अनेक ग्राहकांना योग्य वेळी बदलांची जाणीव होत नाही आणि नंतर त्यांना त्रास सहन करावा लागतो. तुम्ही SBI, PNB […]

    Read more