Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या
बांगलादेशातील हिंदू नेते भावेश चंद्र रॉय यांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कट्टरपंथीयांनी प्रथम त्यांचे घरातून अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण करून ठार मारले. शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील एका गावात घडली.