Bangladesh : बांगलादेशने केला मोठा दावा, म्हटले ‘शेख हसीना यांच्या पक्षाचे लाखो सदस्य भारतात पळून गेले’
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी असा दावा केला आहे की पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले आहेत. आलम यांचे हे विधान माध्यमांमध्ये आले आहे. बांगलादेशी न्यूज पोर्टल bdnews24.com नुसार, हसीनाच्या कार्यकाळात बेपत्ता झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या ईद समारंभात आलम यांनी हे विधान केले.