Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया
बांगलादेशातील एका हिंदू नेत्याच्या हत्येचे प्रकरण जागतिक मुद्दा बनले आहे. हिंदू अल्पसंख्याक नेते भावेश चंद्र रॉय यांच्या अपहरण आणि हत्येवर भारत सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अंतरिम सरकारच्या काळात हिंदू अल्पसंख्याकांचा छळ करण्याच्या पद्धतीनुसार ही हत्या झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.