Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान
बांगलादेश पोलिसांनी इंटरपोलला माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे. हसिनांव्यतिरिक्त, इतर ११ जणांविरुद्धही अशीच मागणी करण्यात आली आहे.