Bangladesh : भारताच्या कारवाईनंतर बांग्लादेश आक्रमक; भारतीयांसाठी व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत असताना बांग्लादेशने प्रत्युत्तरात्मक पाऊल उचलले आहे. नवी दिल्लीतील बांग्लादेश उच्चायोगाने सोमवारी भारतातील नागरिकांसाठी कांसुलर तसेच व्हिसा सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. आजतकशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, बांग्लादेशचे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.