Mahua Moitra : बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांना अटक; महुआंनी केली भारताशी तुलना, भाजपचे प्रत्युत्तर
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांनी बुधवारी बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांच्या अटकेचा जुना फोटो शेअर केला. त्यांनी “येथेही हे घडणार आहे” असे कॅप्शन दिले. त्यांचा रोख मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्याकडे होता.