Dhaka : ढाकात बांगलादेश वायूदलाचे मेड इन चायना विमान शाळेवर कोसळले; पायलटसह 19 ठार, 164 जखमी
सोमवारी ढाका येथील एका शाळेवर बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान कोसळले. एपी वृत्तानुसार, या अपघातात पायलटसह १९ जणांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात १६४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ६० हून अधिक जखमींना बर्न इन्स्टिट्यूटमध्ये रेफर करण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या अनेकांवर उत्तरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.