Banaskantha : गुजरातमध्ये ११ जण जिवंत जळाले ; बनासकांठा जिल्ह्यातील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट
गुजरातमधील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. स्फोटात झालेल्या आगीत ११ कामगार मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात घडली.