Anil Ambani : अनिल अंबानी समूहाची १,१२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; आतापर्यंत १०,११७ कोटी रुपये जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या १,१२० कोटी रुपयांच्या नवीन मालमत्ता जप्त केल्या. यामुळे समूहाविरुद्ध जप्त केलेली एकूण मालमत्ता १०,११७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.