बाळ ते बाळासाहेब; मीरा भाईंदरच्या नव्या कलादालनातून उलगडला भव्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास!!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर येथे साकारण्यात आलेल्या स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कलादालनाचे उद्घाटन केले. या कलादालनाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.