Balaghat : बालाघाटच्या डोंगराळ भागात चकमक, चार नक्षलवादी ठार, तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या पचामा डोंगराळ परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांना ठार मारले असून, त्यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ही कारवाई बिठली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भागात करण्यात आली.