Bajrang Sonawane, : धनंजय मुंडेंना मंत्रिपद आणि कराडला जामीन मिळणार नाही; खासदार बजरंग सोनवणेंचा टोला
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ना वाल्मीक कराडला जामीन मिळणार, ना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार, अशी टीका सोनवणे यांनी केली आहे