Bajinder Singh : स्वयंघोषित पाद्री बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा ; बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दिला निकाल
मोहाली न्यायालयाने बलात्कार प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली आणि स्वयंघोषित पाद्री बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताना पीडित महिला न्यायालयात उपस्थित होती. २०१८ मध्ये, मोहालीतील झिरकपूर येथील एका महिलेने पास्टर बजिंदर सिंग यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. शिक्षा सुनावण्यापूर्वी पीडितेने माध्यमांना सांगितले की, तिने ७ वर्षे ही लढाई लढली आहे.