Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची तुरुंगवारी टळली; हायकोर्टाकडून 1 लाखाचा जामीन मंजूर; पण शिक्षेला स्थगिती नाही, आमदारकीवरही टांगती तलवार!
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून आता त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात त्यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.