Bagu Khan : ह्यूमन GPS नावाने कुप्रसिद्ध दहशतवादी बागू खान ठार; 25 वर्षांत 100 हून अधिक घुसखोरीचे प्रयत्न
जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) सुरक्षा दलांनी दहशतवादी बागू खान, ज्याला ह्यूमन जीपीएस म्हणून ओळखले जाते, त्याला ठार मारले आहे. बागू खानला समंदर चाचा म्हणूनही ओळखले जात असे. सुरक्षा एजन्सींच्या यादीत तो हिजबुल मुजाहिदीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता.