Trump : ट्रम्प यांना हवा अफगाणिस्तानच्या बग्राम तळावर ताबा; चिनी अणुकार्यक्रमाच्या निगराणीचा हेतू
अफगाणचा बग्राम हवाई तळ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र बनला आहे. लंडनमध्ये ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, आम्ही ते परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण त्यांना (तालिबान) आमच्या वस्तूंची आवश्यकता आहे. ते आमच्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे, कारण ते चीन त्यांची अण्वस्त्रे जिथे बनवते तिथून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे.