Badrinath Dham : बद्रीनाथ धाममध्ये बर्फवृष्टी, तापमान शून्यावर; भाविकांची गर्दी, 15.90 लाख लोकांनी घेतले दर्शन
उत्तराखंडमधील चमोली येथील बद्रीनाथ मंदिरात बुधवारी सकाळी नोव्हेंबर महिन्यातील पहिली बर्फवृष्टी झाली. संपूर्ण मंदिर परिसर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकला गेला होता, ज्यामुळे मंदिराचे एक विहंगम दृश्य निर्माण झाले.