Ajit Pawar : अजित पवार म्हणाले- कार्यकर्त्यांना बाजूला करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही; पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ
पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी खड्यासारखे बाजूला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. बानेर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण आणि गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.