Babbanrao Taywade : वडेट्टीवारांनी भूतकाळात चूक केली, पण ती सभेत दाखवणे योग्य नव्हते, तायवाडेंचा भुजबळांना सल्ला
मंत्री छगन भुजबळ हे समाजाचे मोठे नेते आहेत. एका प्रकारे ते वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्या ओबीसी नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणणे योग्य नाही, भुजबळ यांनी तसे करायला नको होते, असे म्हणत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.