Babanrao Taywade : सरकारच्या GRनंतर कुणबीचे केवळ 27 दाखले जारी; बबनराव तायवाडेंनी दिली आकडेवारी; जरांगेंना धक्का!
2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. तायवाडे यांच्या मते, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले, आणि त्यापैकी फक्त 27 अर्ज मंजूर झाले आहेत. बबनराव तायवाडेंनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का बसणार आहे.