Baba Sivanand : १२८ वर्षीय योगगुरू बाबा शिवानंद यांचे निधन… वाराणसीमध्ये घेतला अखेरचा श्वास, २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
१२८ वर्षीय योगगुरू बाबा शिवानंद यांचे शनिवारी रात्री ८.४५ वाजता वाराणसीमध्ये निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना बीएचयूमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. बाबा शिवानंद यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य योगाभ्यासासाठी समर्पित केले. त्यांनी साधे जीवन जगले आणि आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळले. पंतप्रधान मोदी स्वतःही शिवानंद बाबांच्या योगाभ्यासाचे चाहते होते. त्यांना २१ मार्च २०२२ रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ते सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत.