Sabarimala : सबरीमाला सोने चोरीप्रकरणी माजी मंदिर अधिकाऱ्याला अटक; SIT न्यायालयाकडून कोठडी मागेल
केरळच्या सबरीमाला मंदिरात सोन्याच्या तुटवड्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) बुधवारी माजी मंदिर अधिकारी बी. मुरारी बाबू यांना चांगनासेरी येथील त्यांच्या घरातून अटक केली. एसआयटीने गुरुवारी सांगितले की, तिरुवनंतपुरम येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात मुरारी यांची चौकशी सुरू आहे.