B.J. Medical College : बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना टाटा समूह देणार एक कोटींची भरपाई; होस्टेलच्या पुनर्बांधणीसाठीही मदतीचा हात
अहमदाबादमधील एअर इंडिया ड्रीमलाइनर विमानाच्या भीषण अपघातात मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. यामध्ये २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स हे विमानात होते, तर उर्वरित ३३ जण बी.जे. मेडिकल कॉलेजच्या आवारात जमिनीवर उपस्थित होते. टाटा समूहाने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांनाच प्रत्येकी एक कोटी कोटींची भरपाई देण्याची घोषणा केली आहे मग ते प्रवासी असोत किंवा जमिनीवरचे नागरिक जे विमान पडल्याने मृत्युमुखी पडले.